Suresh Dhas : विषय संपला; प्राजक्ता माळी प्रकरणी महिला आयोग ॲक्शनमोडमध्ये, सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया,VIDEO

Suresh Dhas News : प्राजक्ता माळी प्रकरणी महिला आयोग ॲक्शनमोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी माझ्यासाठी विषय संपल्याचे सुरेश धस यांनी जाहीर केले.
Prajkta Mali and Suresh Dhas
Prajkta Mali and Suresh Dhas
Published On

मुंबई : आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीवर केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी कारवाईसाठी आक्रमक झाली आहे. प्राजक्ता माळीने रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर प्राजक्ताने महिला आयोगाला देखील तक्रार दिली होती. आता या प्रकरणात महिला आयोग अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे. महिला आयोगाने पोलिसांना या प्रकरणात निर्देश दिले आहेत. महिला आयोगाने कारवाई सुरु केल्यानंतर सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासाठी प्राजक्ता माळीचा विषय संपल्याचे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.

बीडमध्ये प्राजक्ता माळीवर भाष्य करताना सुरेश धस म्हणाले,जे काही झाले, त्याला मी सामोरे जायला तयार आहे. मला वाटतं, माझी बाजू अनेकांनी मांडली. संतोष देशमुख आणि बीडमधील जंगलराज या प्रकरणावरून लक्ष हटवू नका. बीडमधील संतोष देशमुख प्रकरण आणि जिल्ह्यातील माजलेली दादागिरी यावर तुम्ही बोला'.

बीड प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी भाष्य केलं. यावेळी आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले. 'बीडमध्ये १०५ शस्त्र परवाने रद्द झाले आहेत. उर्वरित परवण्याबाबत लवकरच पडताळणी होऊन कारवाई होणार आहे. कोणत्या पोलीस अधीक्षक यांच्या काळात अधिक शस्त्र परवाने दिले याची तपासणी होणार आहे. पुढील १५ दिवसांत कारवाई झाली नाही, तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.ज्या लोकप्रतिनिधींनी यासाठी शिफारशी दिल्या, त्यावरही कारवाई झाली पाहिजे. परळीत शस्त्र परवाने जास्त आहेत, त्यामगे आका आणि त्यांचे आका आहेत. राखेचे धंदे करण्यासाठी हे परवाने लागतात का, असा सवाल सुरेश धस यांनी केला.

'संपत्ती जप्त करण्याची कारवाई गतीने व्हायला हवी. मग कळेल की त्यांच्या सोबत कोणाची प्रॉपर्टी आहे? मला फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रश्न विचारा. आरोपींची संपत्ती ही कोट्यवधीची आहे. त्यामुळे ती कार्यवाही गतीने व्हायला हवी. जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही. तोपर्यंत मी बोलणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे माझे नेते आहेत. ते जे म्हणाले, त्याप्रमाणे आम्ही कुठल्याबाबतीत अडथळा आणणार नाही. माझ्यावर कोणीही नेते माझ्या विरोधात बोलले नाहीत, असे सुरेश धस म्हणाले.

'काही लोक रोज शेकडो टिप्पर राख उपसा करतात. या बाबत मी माहिती पोलीस अधीक्षक यांना देणार आहे. पर्यावरण खात्याने थर्मलमुले होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष द्यावे. बडा नेता कोण हे मला माहीत नाही. ज्या आकांवर खंडणीचा गुन्हा आहे, तो दोन कोटींचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेच पालकमंत्री हवे आहेत. ते आष्टी मतदारसंघात एकदा आले होते. तेव्हा मी समज दिली होती. माझ्या मतदारसंघातील गैरप्रकार बंद केले आहेत. मी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली आहे की, त्यांनी पालकमंत्री व्हावे, असे आमदार सुरेश धस पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com