

Mumbai News : मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने अवघ्या देशात संतापाची लाट उसळही होती. जमावाने महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना मणिपूरमधून समोर आली होती. या घटनेनंतर सुप्रीम कोर्टानेही मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. मात्र सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारवरीची टिप्पणी भाजपला पचनी पडताना दिसत नाही. कारण भाजप आमदाराने थेट सुप्रीम कोर्टावरच टीकास्त्र सोडलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत टीका केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केलेल्या टिप्पणीवर आपली प्रतिक्रिया ट्वीट करत दिली आहे.
'सरकारचं काम सुप्रीम कोर्ट करणार असेल तर सुप्रीम कोर्टानंच देश चालवावा. मग कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल', असा निशाणा अतुल भातखळकरांनी साधला आहे.
लोकशाही देशात अशा प्रकारच्या घटना खपवून घेऊ शकत नाहीत. महिलांच्या अधिकारांच्या संदर्भातील अशा प्रकारच्या घटना आत्मा ढवळून काढणाऱ्या आहेत. हे संविधानाच्या अधिकारांचे हनन आहे. बाब स्वीकारार्ह नाही. जे व्हिडिओ समोर आले आहेत, ते खूपच चिंताजनक आहेत. या प्रकरणात मे महिन्यातच कारवाई व्हायला हवी होती. अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
महिलांवरील अत्याचाराची ही घटना ४ मे रोजी घडली होती. त्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आधीच एफआयआर दाखल केला होता. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ४ आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. (tajya Batmya)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.