Manipur Viral Video Incident: मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ४ आरोपी अटकेत; पोलिसांनी दिली माहिती

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) ने ट्विटर इंडियाला संबंधित व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
Manipur Viral Video Incident
Manipur Viral Video IncidentSaamtv
Published On

Manipur Viral Video Update: सध्या मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडिओने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओमध्ये जमावाने दोन महिलांना भररस्त्यात नग्न फिरवताना दिसत आहेत. इतकेच नव्हेतर नराधमांनी पीडित महिलांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात महिलांची नग्न फिरवत अत्याचार करणाणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाला सकाळी अटक करण्यात आली होती. हेरोदास मेईतेई असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आता आणखी ३ आरोपींना अटक केली आहे.

Manipur Viral Video Incident
Raigad Khalapur Irshalgad Landslide News: भविष्यात इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

नराधम आरोपी अटकेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, मणिपूरमधील घृणास्पद घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुख्य आरोपी ज्याने हिरवा टी-शर्ट घातलेला होता त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने महिलेला पकडून ठेवले होते. त्याला आज सकाळी ओळख पटल्यानंतर एका कारवाईत अटक करण्यात आली. आरोपीचे नाव हुइरेम हेरोदास मेईतेई (३२) असे आहे. असेही सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

Manipur Viral Video Incident
Borivali National Park News: बोरीवली नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेले, ओढ्यामध्ये मित्रांसोबत मस्ती करताना २५ वर्षांचा तरुण गेला वाहून

त्यानंतर याप्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे मणिपूर पोलिसांनी ट्वीट केले आहे. त्यानंतर याप्रकरणी एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

व्हिडिओ हटवण्याचे ट्वीटरला आदेश...

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची राष्ट्रीय महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) ने ट्विटर इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुखांना संबंधित व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

दोन महिलांना नग्नावस्थेत धिंड काढणं ही लज्जास्पद बाब आहे. या व्हिडीओंमधून पीडित महिलांची ओळख सार्वजनिक होत आणि हा दंडनीय गुन्हा आहे, असं महिला आयोगाने आदेशात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com