ashish shelar and uddhav thackeray
ashish shelar and uddhav thackeray saam tv

Ashish Shelar | 'आम्‍ही हिंदू सण... '; आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या शिवसेनेप्रमाणे आम्‍ही हिंदू सण बंद करणारे नाही, अशा शब्दात मु्ंबई भाजप अध्यक्ष, आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
Published on

Ashish Shelar News : भाजप हा पक्ष हिंदू सण ठेवणारा, जोपसणारा, वाढवणारा पक्ष आहे. तो आमचा आत्‍मा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या शिवसेनेप्रमाणे आम्‍ही हिंदू सण बंद करणारे नाही, अशा शब्दात मु्ंबई भाजप अध्यक्ष, आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

ashish shelar and uddhav thackeray
मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी शिंदे गटाची तयारी सुरू; मुख्यमंत्र्यांनी आखली नवी रणनीती

मुंबई भाजपातर्फे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्‍सव स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली असून यामध्‍ये 1026 मंडळे सहभागी झाली आहेत. या मंडळाचे परिक्षण करण्‍यासाठी तज्ञांची 30 पथके तयार करण्‍यात आली आहेत. आज मुंबई भाजपा कार्यालयाजवळून या पथकांच्‍या गाडयांना आमदार अॅड आशिष शेलार यांनी झेंडा दाखवून सन्‍मानाने रवाना केले.

सदर स्‍पर्धेबाबत माहिती देताना आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, हिंदू सण हा भाजपाचा आत्‍मा असून आम्‍ही कोरोना काळातही सण अखंडित ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला. कोरोनाचे संकट टळल्‍यानंतर दहिहंडी उत्‍सव भाजपाने जोरदार साजरा केला, आता गणेशोत्‍सवात ही भाजपा हिरहिरीने सहभागी झालो आहोत. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्‍सव स्‍पर्धा जाहीर करताच त्‍याला मंडळाचां प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मुंबईतील १०२६ मंडळे सहभागी झाली आहेत'.

ashish shelar and uddhav thackeray
शिंदे गट म्‍हणजे चायना आयटम; शिवसेना नेते बबन थोरातांचा निशाणा

'सहभागी गणेश मंडाळाचे परिक्षण ३० पथके करणार असून प्रत्‍येक पथकात कॅमे-यासह ३ जण असून एकूण ९० जणांचा समावेश असलेली ही पथके या सगळयांचे परिक्षण करणार आहेत. कोराना काळात दुदैवाने उद्धव ठाकरे यांच्‍या शिवसेनेने १०० वर्षांची लालबागच्‍या राजाची परंपरा खंडित केली. अशा प्रकारे हिंदु सणांना विरोध करणारे आम्‍ही नाही, भाजपा सणांची परंपरा जोपासणारा पक्ष आहे, असा टोलाही आशिष शेलार यांनी यावेळी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com