सुशांत सावंत
Eknath Shinde News : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवरील शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, बंडखोरीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुंबई महानगर पालिकेवरील सत्ता काबीज करण्यासाठी नवी रणनीती आखली आहे.
शिंदे गटाच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. तर शिंदे गटाने भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. शिंदे गटाने राज्यातील सत्ता मिळविल्यानंतर मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांना भेट देत लोकांशी संवाद साधणार आहेत. ६,७,८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतल्या प्रत्येक विभागातील महत्वाच्या मंडळांना भेट देणार आहेत.
शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी दोन्ही गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत. दसरा मेळाव्या होण्याआधीच एकनाथ शिंदेंनी चाचपणी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर एक बैठक पार पडली. यामध्ये विशेष मुंबईवर चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.