Dombivli News: भाजप पदाधिकाऱ्याने दिली जीवे मारण्याची‌ धमकी; पीडितेने पुन्हा केली तक्रार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Manpada Police Station: भाजप पदाधिकाऱ्याने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याची तक्रार या महिलेने काही दिवसांपूर्वी केली होती.
Manpada Police Station
Manpada Police StationSaam Tv
Published On: 

Dombivli BJP: डोंबिवली पूर्व भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी (Nandu Joshi) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना देखील त्यांच्याविरोधात अद्याप कारवाई झाली नाही. नंदू जोशी यांच्याविरोधात पुन्हा एकदा पीडित महिलेने गंभीर आरोप केला आहे. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडित महिलेचे म्हणणे असून तिने पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Manpada Police Station
Mumbai News: पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज! आपत्तींचा सामना करण्यासाठी बीएमसीचा 'मेगा प्लान'

नंदू जोशी हे आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याची तक्रार पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी केली होती. या महिलेच्या तक्रारीनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) नंदू जोशींविरोधाच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच या महिलेने डोंबिवलीतील भाजपाच्या वरिष्ठ नेते-पदाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली होती. पण अद्याप कोणाकडूनही न्याय मिळाला नसल्याचे या महिलेने सांगितले आहे. गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप नंदू जोशी यांना अटक झाली नसून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत पीडितेने आज पुन्हा त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Manpada Police Station
Mumbai University Vice Chancellor: 8 महिन्यांनंतर मुंबई विद्यापीठाला मिळाले नवे कुलगुरु, रवींद्र कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

पीडित महिलेने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मी नंदू जोशीचा हा त्रास सहन करत आहे. अखेर माझी सहनशीलता संपली आणि मी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. सात ते आठ दिवस झाले तरी अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही.' तसंच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होताच तुला जीवे ठार मारणार असल्याची मला आरोपी नंदू जोशी यांच्याकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

Manpada Police Station
Cordelia Cruise Case: बहुचर्चित कॉर्डेलिया क्रुझवर आले होते एनसीबीनेच जप्त केलेले अमली पदार्थ? हायकोर्टात याचिका दाखल

'नंदू जोशीच्या दहशतीमुळे मला घराबाहेर पडणे ही मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्यांनाा पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी माझी मागणी असल्याचे पीडित महिलेने सांगितले. दरम्यान, नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डोंबिवलीमध्ये भाजप आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत मोर्चा देखील काढला होता. खोटा गुन्हा रद्द करण्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली होती.

Manpada Police Station
Ashadhi Wari 2023: आषाढी वारीसाठी सरकार सज्ज! सार्वजनिक बांधकाम मंत्री करणार पायी मार्गाची पाहाणी

याप्रकरणी भाजप पक्ष आक्रमक झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करणार नसल्याचा ठराव देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज करण्यात आला होता. त्यानंतर आज संध्याकाळी या प्रकरणातील पीडितेने गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदू जोशी धमकावत असल्याचा आरोप केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची दोन दिवसांत बदली करतो त्यानंतर तुला मारतो अशी धमकी दिल्याचा पीडितेचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.