रुपाली बडवे, साम टीव्ही
Ashish Shelar Threat Letter : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या कार्यालयात निनावी पत्र आलं होतं. त्या पत्रातून शेलारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांच्या कार्यालयाद्वारे याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. (Breaking Marathi News)
काय आहे धमकीच्या पत्रात?
भाजपा नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात तुम्ही अशीच आक्रमक भूमिका घेत राहिलात तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारून समुद्रात फेकू अशी धमकी याता देण्यात आली आहे. (Maharashtra Political News)
प्राप्त माहितीनुसार, आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या वांद्रे येथील कार्यालयात हे पत्र आलं आहे. कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने पाठवलेले पत्र सापडले. याबाबत आशिष शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दिली.(Latest Marathi News)
याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून हे हस्ताक्षर कोणाचं आहे, कोणत्या पोस्टऑफिसमधून हे पत्र आलं आहे, याचा तपास आता पोलीस (Police) करत आहेत. दरम्यान, आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र प्राप्त होताच, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.