Sharad Pawar Threat: 'भाजपचा कार्यकर्ता असेल तर...' शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Sharad Pawar NCP News
Sharad Pawar NCP NewsSaam tv news
Published On: 

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली आहे. धमकी देणारा हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या धमकीप्रकरणावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. (Latest Marathi News)

भाजपचा कुठलाही कार्यकर्ता असेल तर तो अशा प्रकारची कुठलीही कृती करणार नाही. कुणाला धमकी द्यावी, अशी भाजपची सभ्यता नाहीये, असं भाजप नेते गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे. राजकीय नेत्यांना धमकी देणं हे खपवून घेतलं जाणार नाही, असं देखील महाजन यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Sharad Pawar NCP News
Sanjay Raut Threat: सकाळचा भोंगा बंद करा; संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

पुढे बोलताना गिरीष महाजन (Girish Mahajan) म्हणाले, कुणी असं कृत्य करत असेल तर त्याला निश्चित शिक्षा व्हावी, या मताचे आम्ही आहोत. राज्याचं गृहखातं याबाबतीत सखोल चौकशी करेल. पण उगाच विनाकारण गृहखात्याला बदनाम करायचं, मुद्दाहून टार्गेट करायचं, त्यासाठी जर हा प्रयत्न चालला असेल तर हे योग्य नाही, असंही महाजन म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्याच्या गृहखात्याने याची गंभीर दखल घेतली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar NCP News
Nilesh Rane On NCP Protest: "समोर आलात तर दोन पायावर घरी परत जाणार नाही..."; राष्ट्रवादीच्या आंदोलनाला निलेश राणे यांचं खुलं आव्हान

 अमित शहांनी याकडे लक्ष घालावं : सुप्रिया सुळे

शरद पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. आयुक्तांनी शब्द दिला आहे, ते यात लक्ष घालतील. या सर्वांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते आहे. ज्या पद्धतीने गृह विभाग अपयशी होत आहे याकडे अमित शाह यांनी लक्ष घालावं, अशी माझी विनंती असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.