Nilesh Rane On NCP Protest: "समोर आलात तर दोन पायावर घरी परत जाणार नाही..."; राष्ट्रवादीच्या आंदोलनाला निलेश राणे यांचं खुलं आव्हान

Nilesh Rane On NCP: निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आंदोलनाला आव्हानात्मक प्रत्युत्तर दिलं आहे.
Nilesh Rane On NCP Protest
Nilesh Rane On NCP ProtestSaam TV
Published On: 

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार निलेश राणे यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत थेट औरंगजेबाशी त्यांची तुलना केली. या घटनेनं राष्ट्रवादीतील नेते आक्रमक झाले असून राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अशात निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आंदोलनाला आव्हानात्मक प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest NCP Protest News)

निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं आहे. यात त्यांनी थेट आलेल्या व्यक्ती दोन पायांवर परत जाणार नाही असं म्हटलं आहे. " राणेंना धमकी देऊन काहीच फायदा नाही आम्ही कधीही कोणाच्या धमकीला भीक घातली नाही, समोर आलात तर दोन पायावर घरी परत जाणार नाही लक्षात ठेवा, अशा शब्दांत निलेश रणेंनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाला खुलं आव्हान दिलं आहे.

Nilesh Rane On NCP Protest
Maharashtra Political News: ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदेंची नवी खेळी; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राने आखली नवी रणनीती

तसेच शरद पवार यांच्याविषयी देखील त्यांनी ट्वीटरमध्ये म्हटलं आहे की, "राहिला विषय पवार साहेबांचा तर त्यांच्यात आणि औरंगजेबमध्ये साम्य आढळणं साहजिक आहे, असं म्हणत नलेश राणेंनी शरद पवारांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. "माझ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आंदोलन करणार असेल तर मी त्यांना चॅलेंज करतो की हिंमत असेल तर मुंब्रा शहरामध्ये म्हणजेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात हेच आंदोलन करून दाखवावे. मालेगाव, मुंब्रा, भिवंडी ही तीन शहरं आजच्या आंदोलनाची प्रमुख ठिकाणं असावीत, असं ओपन चॅलेंज निलेश राणेंनी आंदोलकांना केलं आहे.

निलेश राणेंनी वादग्रस्त ट्वीट डिलिट करावे

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त ट्वीट डिलिट करावे. निलेश राणेंच्या वादग्रस्त ट्वीटबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपने माफी मागावी. येत्या 24 तासांत कारवाई केली नाही तर उद्या पोलिस ठाण्यात जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशारा महेश तपासे यांनी दिला होता. अशात निलेश राणे यांनी अद्याप आपले ट्वीट डिलिट केलेनसल्याने आंदोलन भडकले आहे. तसेच ट्वीट डिलिट न करता निलेश राणे यांनी आज आणखीन एक ट्वीट पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे.

Nilesh Rane On NCP Protest
Maharashtra Politics: ॲड. प्रकाश आंबेडकरांचं भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र; फडणवीसांचा उल्लेख करत केली मोठी मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.