Maharashtra Politics: ॲड. प्रकाश आंबेडकरांचं भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र; फडणवीसांचा उल्लेख करत केली मोठी मागणी

Maharashtra Political News: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र लिहिलं आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv

Mumbai News: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र लिहिलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि माजी पोलीस अधीक्षक (पुणे) मो सुवेज हक यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावून त्यांची साक्ष तपासायची असल्याची मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (Latest Marathi News)

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी आपण मला दिनांक 5 जून 2023 रोजी बोलाविले आहे. परंतु यादिवशी पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी मुंबईत नसल्यामुळे हजर राहू शकत नाही. मी दिनांक 14 जून व 15 जून 2023 रोजी मुंबईत आहे. तारखांना साक्ष ठेवल्यास मी हजर राहू शकेन'.

Maharashtra Politics
Maharashtra Political News: 'पैशाच्या हव्यासापोटी...'; क्लस्टरवरून जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

'आपण मला या अगोदर ही अनेक पत्रे पाठविली आहेत. मी याआधी आपल्याकडे मागणी केले होती, त्यानुसार माझी साक्ष घेण्याआधी आपण मला महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक, माजी पोलीस अधीक्षक, पुणे मो. सुवेज हक यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावून त्यांची साक्ष तपासायची आहे, त्याप्रमाणे व्यवस्था करावी, अशी विनंती मी आपणास करीत आहे, असे पत्रात आंबेडकरांनी पुढे म्हटले आहे.

दरम्यान, भिमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारे केलेल्या विनंतीला त्यांच्याकडून काय प्रत्युतर दिलं जातंय, हे पाहावे लागणार आहे.

Maharashtra Politics
BJP News : भाजपमध्ये भाकरी फिरणार? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या फेरबदलांची शक्यता

प्रकाश आंबेडकर यांच्या साक्ष तपासण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'भीमा कोरेगाव प्रकरणात यापूर्वी अनेकांनी आरोप केलेले होते. आता सर्व आयोग ठरवेल. प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा बदलण्यासाठी असे आरोप करत असतात,अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com