Maharashtra Political News: 'पैशाच्या हव्यासापोटी...'; क्लस्टरवरून जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी क्लस्टरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Eknath Shinde And Jitendra Awhad
Eknath Shinde And Jitendra Awhad Saam Tv

Jitendra Awhad News: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी क्लस्टरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'पैशाच्या हव्यासापोटी या प्रकारची क्लस्टर योजना अंमलात आणली गेली, जी पुढील 50 वर्षे पूर्ण होऊ शकत नाही, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवत त्यांना टोमणाही हाणला आहे. (Latest Marathi News)

काल मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या भाषणात आपण विधानसभेच्या गच्चीतून उडी मारून जीवन संपविण्याची धमकी दिल्यानंतर ठाण्यातील क्लस्टरला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चालना दिल्याचं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाडांनी शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे. 'मी जेव्हापासून राजकारणामध्ये आहे. तेव्हापासून त्यांनी कुठे उडी मारेन, असे बोलल्याचे आठवत नाही. त्यांनी सांगावं ते कुठे बोलले, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Eknath Shinde And Jitendra Awhad
BJP News : भाजपमध्ये भाकरी फिरणार? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या फेरबदलांची शक्यता

आनंद दिघे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना आव्हाड म्हटले,आनंद दिघे यांच्या बाबतीत जे बोललो ते बोललो. मला काहीही फरक पडत नाही. मी शब्द कधीही मागे घेत नाही. जसं सिंधी समाजाला भडकावून भाजपचे नगरसेवक कामाला लागले आहेत. मी 'केस'ला घाबरत नाही. यावरून त्यांची मानसिकता दिसून येत आहे'.

माझ्यावर दाखल होणारे गुन्हे मंत्र्यांच्या दबावामुळे होत असल्याचा आव्हाडांनी केला आरोप आहे. 'पोलिसांवर कितीही दबाव आणून गुन्हे दाखल करा, मला फरक पडत नाही. मी कोणाला घाबरत नाही, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde And Jitendra Awhad
Ahmednagar News : संगमनेरमधील 'भगवा' मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक, अनेक गाड्यांचं नुकसान

'हेगडेंना वकील म्हणून देणारे एकही माणूस यातला नाही, फक्त राजन विचारे आहेत. बाकी सर्व गेले. ही माहीत नसलेली मंडळी आहेत, ज्यांना काही माहीत नाही ते बरळू शकतात, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

'शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांना भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार आहे. आज ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्हाला कमळ निशाणीवर लढवावं लागेल, कारण तुमच्याकडे निशाणी राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com