BJP News : भाजपमध्ये भाकरी फिरणार? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या फेरबदलांची शक्यता

BJP News : जिल्हाध्यक्षांची फेरबदल आणि संघटनात्मक बदलासाठी भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
BJP News
BJP NewsSaam TV

Nagpur News : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी वेगाने हालचाली करत आहे. भाजप देखील प्रदेश भाजपच्या जिल्हा स्तरावर मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

जिल्हाध्यक्ष बदलले जाणार

राज्यातील भाजपचे ८० टक्क्यांपेक्षा जास्त जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज्यातील २५ पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये भाजप नवीन अध्यक्ष नेमले जाणार आहेत. जिल्हाध्यक्षांचे फेरबदल आणि संघटनात्मक बदलासाठी भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.  (Maharashtra News)

BJP News
ShivRajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम, मात्र बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजच नाहीत; राज्य सरकारचा प्रताप

प्रदेश भाजपच्या जिल्हा स्तरावरील बदलांबाबत चर्चा करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कोअर ग्रुपची आज बैठक होणार आहे.

BJP News
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या टप्प्यात इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार!

पक्षाचे 7 मंत्री उपस्थित राहणार

भाजप कोअर ग्रुपच्या बैठकीत पक्षाचे 7 मंत्री उपस्थित राहणार आहे. आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत भाकरी फिरण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com