Rajyabhishek Banner: राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे. एकीकडे शिवराज्याभिषेकाचा जल्लोष सुरु असताना भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं एक बॅनर चर्चेत आहे आहे.
महाराष्ट्र शासनच्या सांस्कृतिक कार्य विभागमार्फत मुंबईत गेटवे ऑफ इंडिया भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कारण शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाविषयीच्या बॅनरवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसत नाही. बॅनरवर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा फोटो आहे. तर राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरच्या कोपऱ्यात फोटो आहे. (Maharashtra News)
मात्र या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसल्याने शिवप्रेमी आणि विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'हे आहेत महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री! यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यातही यांनी हलकट राजकारण केलेच.'
'छत्रपती शिवरायांचा फोटो टाकण्याचं औदार्यही यांच्यात नाही. यांचा कडेलोट करायला शिवप्रेमी आतुर आहेत. #गलिच्छ राजकारण'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.