

Death Threat To Sanjay Raut: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)
माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने सुनील राऊत यांना फोन केला. या फोनवरून संजय राऊत यांना जीवे मारू अशी धमकी देण्यात आली. दोन राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत या दोघांनाही अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा फोन कॉल आला असल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत त्यांनी पोलिसांना दिली.
या संबंधी देण्यात आलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांनी सकाळी 9 वाजेचा भोंगा बंद करावा, त्यासाठी एक महिन्याचा वेळ देत असल्याचे या फोनवर सांगण्यात आले आहे. हा धमकीवजा फोन सुनील राऊत यांच्या फोनवर आला असून संबंधित व्यक्ती हिंदी भाषेत बोलत असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये संबंधित व्यक्ती वारंवार सकाळी नऊ वाजेचा भोंगा बंद करा, अशा इशारा देत होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना (Police) दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे.
'तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली आहे. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.
आयुक्तांनी शब्द आहे मी ते याता लक्ष घालतील. या सर्वांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते आहे. ज्या पद्धतीने गृह विभाग अपयशी होत आहे याकडे अमित शाह यांनी लक्ष घालावं, अशी माझी विनंती असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.