सचिन जाधव| पुणे, ता. २१ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज पुण्यामध्ये भाजपचे अधिवेशन पार पडणार असून राज्यभरातील ५००० पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी आज पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे भव्य अधिवेशन पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडांगण येथे होणाऱ्या या अधिवेशनाला राज्यभरातून तब्बल ५००० पदाधिकारी सहभागी होणार आहेत. आगामी विधानसभेची रणनिती, विविध कार्यक्रम तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या अधिवेशनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या अधिवेशनातून भाजपच्या संवाद यात्रेची घोषणा होणार आहे. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील योजना सांगितल्या जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.