Maharashtra Politics: विधानसभेआधी काका-पुतण्या एकत्र? अजित पावर यांच्या आमदाराच्या दाव्यानं खळबळ

Shraddha Pawar and Ajit Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याबाबतचं विधान केलं. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. हे दोन्ही नेते खरोखरच एकत्र येतील का? अशी चर्चा आता रंगली आहे.
विधानसभेआधी काका-पुतण्या एकत्र? अजित पावर यांच्या आमदाराच्या दाव्यानं खळबळ
Sharad Pawar And Ajit PawarSaam TV
Published On

जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागलीय तसतशी पुन्हा नवनवी राजकीय समीकरणं जुळतात की काय अशा हालचाली राज्यात सुरू झाल्या आहेत. याला कारण आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी घेतलेली शरद पवारांची भेट, ते केवळ भेट घेऊन थांबले नाहीत तर त्यांनी थेट शरद पवार आणि अजित पवार विधानसभेत एकत्र येतील असं भाकीतही वर्तवलंय. त्यामुळे पुन्हा एकदा काका-पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अतुल बेनके म्हणाले आहे की, विधानसभेपूर्वी दादा-साहेब एकत्र येणार.

महायुतीत कोणती जागा कुणाला सुटणार याचा तिढा वाढत चालल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ आहेत का? असा प्रश्न यानिमित्तानं निर्माण झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही असाच सूर आळवलाय.

विधानसभेआधी काका-पुतण्या एकत्र? अजित पावर यांच्या आमदाराच्या दाव्यानं खळबळ
Maharashtra Politics: मविआला बहुमत मिळाल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार? विधानसभेत 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास

दरम्यान, अतुल बेनके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार आहेत. शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या घरी जाऊन बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली हे विशेष आहे. तोच धागा पकडून पवारांनीही ज्यांनी लोकसभेत आमच्या राष्ट्रवादीला मदत केली ते आमचे, असं सूचक विधान केलंय.

विधानसभेआधी काका-पुतण्या एकत्र? अजित पावर यांच्या आमदाराच्या दाव्यानं खळबळ
Maharashtra Politics: मविआला बहुमत मिळाल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार? विधानसभेत 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनेकदा करत असतात. बेनकेंनी पवारांची भेट घेतल्यामुळे याची अधिकच चर्चा रंगलीय. मात्र बेनकेंनी थेट काका-पुतणे एकत्र येणार असल्याचं भाकित वर्तवल्यामुळे पडद्याआडून काही घडामोडी सुरू आहेत का अशी चर्चा आता जोर धरू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com