Maharashtra Politics : भाजपचं तिकीट वाटू नका, माझ्यात प्रचंड क्षमता; कपिल पाटलांचं खासदार बाळ्यामामांना जोरदार प्रत्युत्तर

kapil patil News : भाजपचं तिकीट वाटू नका, माझ्यात प्रचंड क्षमता आहे, असं म्हणत कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
 भाजपचं तिकीट वाटू नका, माझ्यात प्रचंड क्षमता; कपिल पाटलांचं यांचं खासदार बाळ्यामामांना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra Politics Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. 'माझी हिम्मत कुणाला बघायची गरज नाही. माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे. मी कुणाच्या भरवशावर निवडणूक लढवत नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे यांना लगावला आहे.

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान, विद्यमान खासदार सुरेश मात्रे यांनी हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान माजी केंद्रीय मंत्री पाटील यांना दिलं होतं. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली आहे.

 भाजपचं तिकीट वाटू नका, माझ्यात प्रचंड क्षमता; कपिल पाटलांचं यांचं खासदार बाळ्यामामांना जोरदार प्रत्युत्तर
Kapil Patil यांचा भिवंडीत दंगल घडवण्याचा डाव, Suresh Mhatre यांचा खळबळजनक आरोप

'सुरेश म्हात्रे यांना विचारायची गरज काय, तुमच्या पक्षाचं बघावं, माझ्या पक्षाची तिकीट वाटू नका, लोकांनी सेवा विकास करण्याची संधी दिली आहे. विकास करायचा विचार करा, कपिल पाटील यांचं नाव घेण्याशिवाय याना टीआरपी मिळत नाही. मला पक्षाने सांगितलं लढा, तर मी लढणार. मला काय यांची परवानगी पाहिजे का ? असा सवाल करत कपिल पाटील यांनी बाळ्यामामांना टोला लगावला. 'आम्ही हार पचवून पाच तारखेपासून कामाला लागलो, त्यांना विजयही पचवता आलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला.

 भाजपचं तिकीट वाटू नका, माझ्यात प्रचंड क्षमता; कपिल पाटलांचं यांचं खासदार बाळ्यामामांना जोरदार प्रत्युत्तर
Kapil Patil News : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडी पोलिसांत गुन्हा; काय आहे प्रकरण?

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे अबू आझमींना प्रत्युत्तर

'मुंबई घडवण्यात उत्तर भारतीयांचं मोठं योगदान आहे. मला गृहमंत्री बनवलं तर मी राज्यातील दूषित वातावरण शांत करणार, असं वक्तव्य करणारे सपाचे नेते, आमदार अबू आझमी यांना कपील पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावर बोलताना माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते कपिल पाटील यांनी उत्तर प्रदेशमध्ये त्यांची सत्ता होती. तेव्हा तिथे का नाही केलं, त्यासाठी योगींना याव लागलं. मुंबईच्या जडणघडणीमध्ये जास्तीत जास्त लोक मराठीच होती. मी असा दावा करणार नाही. मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी आहे. इथे सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे.मुंबईच्या जडणघडणीत सर्वांचं योगदान आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न कुणी करत असेल, तर ते चुकीचं आहे, असा पलटवार माजी केंद्रीय मंत्री कपिल यांनी अबु आझमी यांच्यावर केला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com