Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Deputy CM Eknath shinde: ठाण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ठाण्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
Deputy CM Eknath shinde Saam tv
Published On

Summary -

  • महापालिका निवडणुकीदरम्यान ठाण्यात मोठी राजकीय घडामोड घडली

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला

  • शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या मिनाक्षी शिंदेंचा तडकाफडकी राजीनामा

  • विक्रांत वायचळ यांच्या हकालपट्टीमुळे नाराज होत त्यांनी राजीनामा दिला

विकास काटे, ठाणे

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाण्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाने बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली. या नेत्यावर कारवाई केल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना महिला आघाडीच्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला. महिला नेत्याच्या राजीनाम्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन पालिका निवडणुकीत ठाण्यात शिंदे गटात नाराजी नाटय सुरू झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगर येथील शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. विक्रांत वायचल यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य सुरू झाले आहे. शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे या नाराज झाल्या असून त्यांनी राजीनामा दिला.

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, २ बड्या नेत्यांचा ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश

विक्रांत वायचळ हे ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. शिवसेनेतून वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज झाल्या त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. ऐन महापालिका निवडणुकीत नाराज मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे राहिल. मिनाक्षी शिंदे या शिवसेनेच्या ठाण्यातील मोठ्या नेत्या आहेत. त्या २००७ ते २०१७ पर्यंत त्या सलग तीन वेळा ठाणे महानगरपालिकेत निवडून आल्या आहेत. त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी आहेत.

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

मिनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला. मिनाक्षी शिंदे यांनी या पत्रात असे लिहिले की, 'मी माझ्याकडे असलेल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटक या पदाचा राजीनामा सादर करत आहे. आजवर पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पक्षाची आणि सर्व वरिष्ठ नेत्यांची ऋणी आहे. वैयक्तिक कारणास्तव आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून मी माझ्या पदाचा त्याग करत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा ही विनंती.' मिनाक्षी शिंदा यांचा राजीनामा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला हादरा; बडा नेता फोडला, राजकीय समीकरण बदलणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com