Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, २ बड्या नेत्यांचा ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश
CM Devendra FadnavisSaam Tv

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, २ बड्या नेत्यांचा ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश

Navi Mumbai Politics: नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. शेकापने भाजपला मोठं खिंडार पाडले. भाजपच्या दोन दिग्गज महिला नेत्यांनी ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये पक्ष प्रवेश केला.
Published on

Summary:

  • नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार पडलं

  • भाजपच्या २ दिग्गज महिला नेत्यांनी शेकापमध्ये केला पक्षप्रवेश

  • या महिला नेत्यांसोबत ५०० कार्यकर्त्यांनी शेकापचा झेंडा हाती घेतला

  • या पक्ष प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला

  • कळंबोलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

महापालिका निवडणुकीपूर्वी ऑपरेशन लोटस यशस्वी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपलाच नवी मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. नवी मुंबईमधील भाजपच्या दोन दिग्गज महिला नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. त्यांनी आपल्या ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा भाजपसाठी सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाला रामराम करताना या दिग्गज नेत्यांनी भाजपने जनतेची कामं केली नसल्याचा आरोप केला.

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, २ बड्या नेत्यांचा ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के, महापालिकेच्या रणधुमाळीत पुण्यात शिवसेना शून्यावर

नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कळंबोली परिसरातील भाजपच्या सक्रिय नेत्या गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला. या दोन्ही महिला नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षात बुधवारी जाहीर प्रवेश केला. भाजपच्या वरिष्ठांकडून गोरगरीब जनतेची कामे होत नसल्याचा आरोप करत त्यांनी जवळपास ५०० कार्यकर्त्यांसह शेकापचा झेंडा हातामध्ये घेतला. या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, २ बड्या नेत्यांचा ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश
Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांचा पक्षप्रवेश सोहळा शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांनी सांगितले की, 'स्थानिक पातळीवर जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून शेकापच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.' या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, २ बड्या नेत्यांचा ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश
Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com