Vertical Property Card : मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड, महत्त्वाची अपडेट समोर

Flat Owners : महाराष्ट्र सरकारने फ्लॅट आणि गाळेधारकांसाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड योजना सुरु केली आहे. त्यामुळे मालकी हक्काची अधिकृत नोंद मिळणार असून मालमत्ता व्यवहार आणि कर्जप्रक्रिया जास्त सोयीस्कर होणार आहे.
Vertical Property Card
Vertical Property Cardgoogle
Published On

महाराष्ट्र सरकार सदनिका मालकांसाठी (फ्लॅट मालकांसाठी) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातल्या शहरी भागात बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या फ्लॅटधारकांसाठी आणि गाळेधारकांसाठी स्वतंत्र ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक फ्लॅटधारकाच्या मालकी हक्काची अधिकृत नोंद होईल. तसेच मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये याचा जास्त फायदा होईल.

भूमिअभिलेख विभागाच्या माहितीनुसार, राज्यातल्या जवळपास १६ कोटी ५३ लाखांपेक्षा जास्त सदनिकाधारक आणि गाळेधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी संबंधित मालकांना फक्त ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. या प्रक्रियेमुळे शासनाला ८२६ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

Vertical Property Card
ITR Filling 2026 : करदात्यांनो लक्ष द्या! ITR फाइल केला? मग 30 जूनपर्यंत ई-मेल नक्की तपासा; कारण जाणून घ्या

ग्रामीण आणि शहरी भागातल्या जमिनींसाठी पारंपारिक प्रॉपर्टी कार्ड किंवा मालकी हक्काची माहिती असते. पण, शहरांमध्ये वाढत्या बहुमजली इमारतींमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाच्या स्वतंत्र मालकीची स्पष्ट नोंद ठेवणं हे आव्हानात्मक ठरत होतं. ही अडचण सोडवण्यासाठी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डामध्ये संबंधित फ्लॅट किंवा व्यावसायिक गाळ्याची स्वतंत्र मालकी नोंदवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचा अधिकृत पुरावा मिळणार आहे. मालमत्ता खरेदी-विक्री, कर्जप्रक्रिया किंवा इतर कायदेशीर व्यवहारांमध्ये हे कार्ड महत्वाची भूमिका बजावणार आहे.

तसेच सातबारा उताऱ्यावर फक्त जमिनीचीच नाही तर त्या जमिनीवरील इमारतीतील प्रत्येक सदनिकाधारकाची नोंद करण्याची व्यवस्था तयार करण्यात येण्याची शक्यता आहे.

Vertical Property Card
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठवा वेतन लागू होण्याआधीच मोठी अपडेट समोर, डीए वाढीची शक्यता

या निर्णयामुळे शहरी भागातील लाखो नागरिकांना त्यांच्या मालमत्तेच्या हक्काचे अधिक स्पष्ट आणि कायदेशीर संरक्षण मिळणार असून मालमत्ता व्यवस्थापनातही मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com