Kandivali water cut : कांदिवलीकरांसाठी मोठी बातमी, सोमवारी पाणीपुरवठा बंद

Kandivali water cut : कांदिवली (पूर्व) येथे २ ते ३ जून दरम्यान जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाकूर संकुल, समता नगर, चिखलवाडी भाग प्रभावित होणार. नागरिकांनी पाणी साठवून ठेवा आणि काटकसरीने वापरावे, असे BMC कडून आवाहन.
Mumbai Water Cut
Mumbai Water CutSaam Tv
Published On

संजय गडदे , मुंबई प्रतिनिधी

Mumbai Water Cut News : पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कांदिवली (पूर्व) येथे जलवाहिनी जोडणी व झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सोमवार, २ जून दुपारी १.३० ते मंगळवार, ३ जून सकाळी ७.३० या दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आर दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आर दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन केले आहे. कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत ९०० मिलीमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे व ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहे.

Mumbai Water Cut
Nilesh Chavan Arrested: ३ राज्यातून प्रवास, अखेर १० दिवसानंतर नेपाळमध्ये बेड्या, निलेश चव्हाणला आज कोर्टात हजर करणार

कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत ९०० मिलीमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे व ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत हे काम करण्याचे नियोजित आहे.

Mumbai Water Cut
पुण्यात FIITJEE स्कॅम, ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक

या कालावधीत म्हणजे सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत आर दक्षिण विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

Mumbai Water Cut
पुण्यात FIITJEE स्कॅम, ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक

या विभागात पाणीपुरवठा बंद-

आर दक्षिण विभाग : ठाकूर गाव, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५) (दिनांक २ जून २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील).

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Mumbai Water Cut
Pune News : हडपसरमध्ये गोळीबार, मस्तीत मारलेली गोळी भावाला लागली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com