मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय. दिवाळीचा सण जवळ आला असताना त्यांना मिळणाऱ्या बोनसची घोषणा झाली नव्हती. आज अखेर मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केलीय. वर्षा निवासस्थानी यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला. (Latest News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी २६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलीय. बीएमसीचे कर्मचारीही बोनसच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. दिवाळीच्या सणाआधी मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा केल्यानं कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. बोनसच्या मागणीबाबत कर्मचारी संघटनांची मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह यांची मुख्यमंत्र्यांसोबत सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी बैठक पार पडली.
दिवाळी बोनसच्या घोषणा करण्यात येत नसल्याने राज्य सरकारवर टीका केली जात होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंनी एक्सवर पोस्ट करत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरून त्यांनी सरकाराला लक्ष्य केले होते.
मुंबई महापालिका आणि बेस्ट च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? देणार असेल, तर कधी? दिवाळी संपल्यावर?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला होता. आज वर्षा बंगल्यावर झालेल्या मुंबई महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बोनसची घोषणा केली.
मागील वर्षी २२ हजार ५०० रुपये इतका दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. यावर्षी ३० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी कामगार संघटना समन्वय समितीने केली होती. त्यामुळे मुंबई महापालिका किती बोनस जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तर आदित्य ठाकरेंनी देखील सरकार किती आणि कधी बोनस मिळणार असा प्रश्न केला होता. दरम्यान यावर्षी मागील वर्षापेक्षा यावर्षाच्या बोनसमध्ये साडेतीन हजारांची वाढ केली गेली आहे.
मुंबई पालिकेचे आणि बीएसटी कर्मचारी यांना 26 हजार बोनस द्यायचा निर्णय घेतलाय. मुंबई स्वच्छ ठेवण आणि सुंदर करण्यासाठी जे काम करतात त्यांची दिवाळी सुखाची जावी, यासाठी २६ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर ५ लाख रुपयांपर्यत गट विमा दिला जाणार आहे. राज्य सरकारने शिक्षकांचे विषयदेखील सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.
७०० ते ८०० कामगार बहुउद्देशीय म्हणून काम करतात त्यांनादेखील बोनस देण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांना देखील अनुदान देण्यात येणार आहे. याचबरोबर अंगणवाडी सेविकांनादेखील बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.