Manasvi Choudhary
दिवाळी जवळ आली की प्रत्येक नोकरी करणारा व्यक्ती बोनस किती मिळेल याचं कॅल्क्युलेशन सुरु करतो.
बोनस दिवाळीला कंपनी किंवा संस्थेकडून गिफ्ट किंवा पैशांच्या स्वरुपात मिळतो.
भारतात इंग्रजांच्या काळापासून दिवाळीला बोनस देण्याची पद्धत सुरू झाली.
इंग्रजाच्या काळात कामगार रोजंदारीवर काम करत असत. म्हणजे कामगारांच्या कामाचा मोबदला आठवड्याला दिला जात होता.
इंग्रजांच्या राजवटीत, कामगारांना आठवड्याचा मोबदला असा ५२ आठवडे पगार मिळत असे.
एका महिन्यात चार आठवडे अशा हिशेबाने वर्षभराच्या पगारानुसार १३ महिने पगार असायला हवा.
मात्र इंग्रजाच्या धोरणानुसार १२ महिन्यांचा पगार मिळत होता.
५२ आठवड्यांऐवजी ४८ आठवड्यांचाच पगाराचं गणित जेव्हा कामगारांच्या लक्षात आले तेव्हा कामगार आक्रमक झाले त्यांनी आंदोलन केलं.
त्यावेळी इंग्रज सरकारने यावर तोडगा म्हणून एक महिन्याचा पगार हा दिवाळी या मोठ्या सणाला द्यायचा निर्णय घेतला.