Ganesh Chaturthi 2023: गणेशमूर्तीबाबत मुंबई महापालिकेच्या बैठकीत मोठा निर्णय; मूर्तीकारांचे एक हजार रुपयेही वाचणार

Ganesh Chaturthi 2023 :या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाने मूर्तीकारांचे पैसेही वाचणार आहेत.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 Saam Tv
Published On

Mumbai News: गणेशोत्सवाला काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतेक घरांघरात गणेशमूर्तीचं आगमन होणार आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाने मूर्तीकारांचे पैसेही वाचणार आहेत. (Latest Marathi News)

मुंबई महानगर पालिकेत आज मुंबईतील गणेशोत्सव मंडळाचे समन्वयक, मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार यांच्यात मुंबई महानगर पालिकेत बैठक पार पडली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतही विविध विषयावर चर्चा झाली.

Ganesh Chaturthi 2023
Kalyan ST Depot: कल्याण एसटी बस डेपो विठ्ठलवाडीला हलवणार, KDMC च्या निर्णयामागं नेमकं कारण काय?

महापालिकेच्या बैठकीत प्रामुख्याने मूर्तीकारांना एक हजार रुपये प्रति मूर्ती अनामत रक्कम भरावी लागणार होती, ती शंभर रुपये करण्यात आली. तसेच सरसकट प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवरील बंदी हटवण्यात आली आहे. या बैठकीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा करता येईल, हा निर्णय झाला आहे.

तसेच या बैठकीत चिनी गणेशमूर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील केसेस कशा मागे घेता येईल, याचा आढावा घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

Ganesh Chaturthi 2023
Pune Metro Fare and Timetable : पुणे मेट्रो प्रवासासाठी भाडे किती असणार? वेळाही ठरल्या, विद्यार्थ्यांसाठी विशेष सूट

अॅड आशिष शेलार यांनी अधिवेशनात केली होती मागणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा आग्रह धरणे योग्य असले तरी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली होती.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शेलार यांनी मागणी केली होती. त्यानंतर आज मुंबई महापालिकेच्या बैठकीत गणेशमूर्तीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com