
पुण्यातील मेट्रो -२ चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे. पुणे मेट्रोची पीसीएमसी ते फुगेवाडी व वनाझ ते गरवारे या मार्गिकेचं उदघाटन गेल्या वर्षी झालं. आता दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित मार्गांमध्ये फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे.
नव्या मेट्रो मार्गामुळे पीसीएमसी ते सिव्हिलकोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे पुणेकरांना शक्य होणार आहे. मेट्रोचे किमान भाडे १० रुपये असणार आहे. तर जास्तीत जास्त भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ प्रवासासाठी ३५ रुपये भाडे लागेल. तर पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल. (Pune News)
पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३० टक्के सवलत असेल. तर मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे.
सकाळी ७ ते ८ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
सकाळी ८ ते ११ दरम्यान- दर १० मिनिटांनी एक ट्रेन
सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान - दर १० मिनिटांनी एक ट्रेन
रात्री ८ ते १० दरम्याना - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
सकाळी ७ ते ८ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
सकाळी ८ ते ११ दरम्यान- दर १० मिनिटांनी एक ट्रेन
सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान - दर १० मिनिटांनी एक ट्रेन
रात्री ८ ते १० दरम्याना - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.