Maharashtra Politics: शरद पवार गटातील दोन बडे नेते अजिदादांच्या गळाला, समर्थनाचं पत्रही दिलं; सूत्रांची माहिती

NCP Crisis Latest News: शरद पवार गटातील दोन बडे नेते अजित पवार यांच्या गळाला लागले असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.
Big Breaking News sharad pawar Group one mla and mp support to ajit pawar maharashtra politics
Big Breaking News sharad pawar Group one mla and mp support to ajit pawar maharashtra politicsSAAM TV
Published On

NCP Crisis Latest News

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरुन नव्याने पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार तसेच खासदारांना आपल्या गटात खेचण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. अशातच शरद पवार गटातील दोन बडे नेते अजित पवार यांच्या गळाला लागले असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Big Breaking News sharad pawar Group one mla and mp support to ajit pawar maharashtra politics
NCP Crisis: राष्ट्रवादीत संघर्षाची ठिणगी! शरद पवारांना धक्का देण्यासाठी अजितदादांनी आखला मोठा प्लान

राष्ट्रवादीतील आणखी एक आमदार आणि खासदाराने अजित पवार गटाला समर्थन दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या दोघांनीही आपलं प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे ते अजितदादांना (Ajit Pawar) समर्थन देणारे ते आमदार आणि खासदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार यांना सध्या लोकसभेतील खासदार अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील यांचा पाठीबा आहे. तर राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण किंवा फौजिया खान यांनी देखील शरद पवार यांनाच समर्थन दिलं आहे. त्यामुळे या चार खासदारांपैकी समर्थन देणारा तो खासदार कोण? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. (Latest Marathi News)

नुकतेच अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) गटातील आमदारांना अपात्र ठरवा, अशी मागणी करणारी याचिका विधिमंडळ कोर्टमध्ये करण्यात आली. या याचिकेनंतर ही माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाला समर्थन करणारा हा खासदार आणि आमदार सध्या शरद पवार गटामध्ये असला तरी योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.

त्यामुळे संबंधित आमदाराला आमदाराला वगळून अजित पवार गटाकडून उर्वरीत १० आमदारांविरोधात विधीमंडळात कारवाईसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करावं अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचं सांगत अजित पवार गटाने ही मागणी केली आहे.

Edited by - Satish Daud

Big Breaking News sharad pawar Group one mla and mp support to ajit pawar maharashtra politics
Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लान बी तयार; आमदार अपात्र प्रकरणात मोठी घडामोड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com