Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

Bhiwandi Building Collapse : भिवंडीतील इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा ८ वर पोहोचला आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची भीती असून अग्निशमन दल आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
Bhiwandi Kohinoor Apartment building collapse latest death Toll update
Bhiwandi Kohinoor Apartment building collapse latest death Toll updateSaam TV Marathi
Published On

फय्याज शेख, भिवंडी प्रतिनिधी

Bhiwandi Kohinoor Apartment building collapse latest death Toll update : भिवंडी येथील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ८ वर पोहोचली असून घटनास्थळी अद्यापही भीतीचे सावट कायम आहे. अग्निशामक दल आणि बचाव पथकांकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जसजसा ढिगारा बाजूला केला जात आहे तसतसा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली एक लहान मुलगा अडकल्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने बचावकार्य अधिक खबरदारीने आणि वेगाने चालवले जात आहे. या दुर्घटनेतील अडकलेल्या इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पथके कसून प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

भिवंडीत इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्य तीव्र; NDRF कडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर

भिवंडी शहरातील भंडारी कम्पाउंड भागात घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि टीडीआरएफ (TDRF) च्या जवानांकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर चालवले जात आहे.

Bhiwandi Kohinoor Apartment building collapse latest death Toll update
Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेतय जशी शोधमोहीम पुढे सरकत आहे तसतसा मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण ढिगारा पूर्णपणे बाजूला केल्याशिवाय आणि शोधमोहीम संपल्याशिवाय दुर्घटनेतील एकूण जीवितहानीचा स्पष्ट आकडा समोर येऊ शकणार नाही, असे बचाव पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Bhiwandi Kohinoor Apartment building collapse latest death Toll update
Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बाधिताच्या कुटुंबाचा हृदयद्रावक आक्रोश

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेनंतर घटनास्थळी नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली असून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. या दुर्घटनेत अडकलेल्या 'समीन' नावाच्या तरुणाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत दुःखाश्रूंनी आपली आपबिती सांगितली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, समीन हा दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये राहत नव्हता; तो जवळच एका सलूनमध्ये (Salon) काम करायचा. दुर्घटनेच्या काही वेळेआधीच तो काही पैसे ठेवण्यासाठी त्या इमारतीमध्ये गेला होता. मात्र, तितक्यात ही काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली आणि तो ढिगाऱ्याखाली गाडला गेला.

Bhiwandi Kohinoor Apartment building collapse latest death Toll update
Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

"तो नक्की कुठे आहे? त्याची अवस्था काय आहे? हे आम्हाला कोणीतरी स्पष्ट सांगा," असा आर्त टाहो त्याच्या कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी घटनास्थळी मारला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या माणसाला लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढावे, यासाठी नातेवाईक रुग्णालय आणि प्रशासनाकडे आशेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com