बदलापूरचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार! 240 कोटींच्या योजनेचं काम महिन्याभरात होणार सुरू

Badlapur Water Supply Project: बदलापूरच्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून 240 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला गती देण्याची मागणी करण्यात आलीय. वामन म्हात्रे यांच्या भेटीनंतर महिनाभरात काम सुरू करण्याचं गुलाबराव पाटील यांचं आश्वासन दिलंय.
Badlapur Water Supply Project
Badlapur Water Supply Projectsaam tv
Published On: 
Summary
  • कुळगाव-बदलापूर शहरातील पाणीटंचाई दूर होणार

  • शिष्टमंडळाने मंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबईत भेट घेतली.

  • महिनाभरात काम सुरू करण्याचं आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं

कुळगांव-बदलापूर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत 240 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला तातडीनं सुरुवात करण्याची मागणी केली. या योजनेचं काम येत्या महिनाभरात सुरू करण्यात येईल, असं आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलंय.

कुळगाव-बदलापूर शहरातील वाढती पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रस्तावित असलेल्या पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करावं, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केली. या योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होणार असल्यानं कामाला विलंब न करता गती देण्याची भूमिकाही शिष्टमंडळाने मांडली.

Badlapur Water Supply Project
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पाणी नियोजनाचा नवा प्लॅन; आठवड्यातील या दिवशी असेन पाणीपुरवठा बंद

दरम्यान, शहरातील सध्याचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठीही गुलाबराव पाटील यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता भांबरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आणि शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. ही योजना मार्गी लागल्यास बदलापूर शहराचा 2056 सालापर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

योजनेच्या निविदा काढून सहा- सात महिने झालेत. तरीही निविदा का मंजूर झाल्या नाहीत. जर मंत्री महोदयांनी त्यात लक्ष घातलं तर काम लवकर होतील.

वामन म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख

Badlapur Water Supply Project
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, पुढचे ७ दिवस पाणी उकळून प्या, नेमकं कारण काय?

कशी आहे बदलापूरची नवीन पाणीपुरवठा योजना?

उल्हास नदीवरील वलिवली येथे जॅकवेल बांधून पाणीपुरवठा केला जाईल.पूर्व आणि पश्चिम विभागासाठी खरवई आणि बेलवली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जातील. खरवई येथे 54 द.ल.लि. आणि बेलवली येथे 60 द.ल.लि. क्षमतेचे प्रकल्प आहेत. शहरात पाणी सुरळीत पोहोचवण्यासाठी नवीन जलकुंभ आणि सुधारित पंपिंग आणि पाईपलाईन यंत्रणा बसवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com