Mumbai News : प्रवास होणार झटपट, बदलापूरहून एका तासात मुंबई गाठता येणार; कसा असेल 'हा' आहे प्रकल्प? वाचा

Access Control Road : एमएमआरडीएद्वारे नवीन अ‍ॅक्सेस कंट्रोल रोड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गामुळे बदलापूर-मुंबई प्रवास ६० मिनिटांत, तर बदलापूर-नवी मुंबई प्रवास ३० मिनिटांत करता येईल.
Access Control Road Mumbai Badlapur
Access Control Road Mumbai BadlapurSaam Tv
Published On

Mumbai News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बदलापूर ते हेदुटणे आणि विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका असा अ‍ॅक्सेस कंट्रोल रोड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या रोडमुळे मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त ६० मिनिटांना पार करणे शक्य होणार आहे. तसेच बदलापूर-नवी मुंबई प्रवास अर्धा तासात करता येणार आहे.

एमएमआरडीएद्वारे लवकरच प्रवेश नियंत्रण मार्गाचा (अ‍ॅक्सेस कंट्रोल रोड) सविस्तर आराखडा तयार करण्याच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. २०.६ किमी लांब असलेल्या या आठ पदरी नियंत्रण मार्गामध्ये ४ अंतरबदल मार्ग, ५ वाहन भुयारी मार्ग, तसेच ३ किमी लांबीच्या एका बोगद्याचा समावेश असणार आहे.

Access Control Road Mumbai Badlapur
Delhi Election 2025 Memes : दिल्ली भाजपची, आपचा पत्ता कट; निवडणूक निकालानंतर मीम्सचा महापूर, बघून खळखळून हसाल

हा रोड बांधण्यासाठी १० हजार, ८३३ कोटी रुपये खर्च होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गावरच्या चामटोली गाव (बदलापूर) येथून सुरु होईल आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील हेदूटमे आंतर बदल मार्गावर संपेल. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांना मुंबई आणि नवी मुंबईशी थेट जोडण्यासाठी हा अ‍ॅक्सेस कंट्रोल रोड बांधला जाणार आहे.

या अ‍ॅक्सेस कंट्रोल रोडवर -

१) ३.९५ किमी लांब एक व्हायाडक्ट असेल.

२) ताहुली हिल्स-शिरगाव दरम्यान ३ किमी लांब बोगदा असेल.

३) चामटोली, बदलापूर, हेदुटणे, कल्याण रिंग रोड असे पाच अंतरबदल मार्ग असतील.

४) अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोबिंवली, काटई नाका या ठिकाणी वाहन भुयारी मार्ग असतील.

Access Control Road Mumbai Badlapur
Devendra Fadnavis : अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा ठाकरेंना शब्द दिला होता का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्यांनी रंग.."

या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा मार्ग बनवण्यासाठी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर अशा शहरातील तब्बल २०० हेक्टर जमीन भूसंपादन करावे लागणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

Access Control Road Mumbai Badlapur
Maharashtra Politics : "त्यांचा चेहराच गंभीर आहे.." एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com