Badlapur Crime: स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर पुन्हा हादरले

Badlapur Crime Update News : बदलापूर पश्चिमेकडील स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी व्हॅन चालकाला अटक करण्यात आली असून अवैध व्हॅनप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
Badlapur Crime: स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर पुन्हा हादरले
Badlapur 4 years Girl Abusing Case Update NewsSaam Tv
Published On
Summary
  • बदलापूर पश्चिमेत स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर अत्याचार

  • आरोपी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली

  • संबंधित स्कूल व्हॅन अवैध असल्याचे उघड

  • घटनेनंतर बदलापुरात संतापाची लाट

  • मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Badlapur 4 years Girl Abusing Case Update News : बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शहरात स्कूल व्हॅनमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला. बदलापूर पश्चिमेकडे ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आज आरोपीला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं सांगितलं.

Badlapur Crime: स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर पुन्हा हादरले
Maharashtra Weather : थंडी गायब उकाडा वाढला! ६ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, राज्यात आज कुठे कसं हवामान?

त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास फॉरेन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि व्हॅनची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी व्हॅन चालकाला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं.

Badlapur Crime: स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर पुन्हा हादरले
Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

शिवाय ज्या स्कुल व्हॅनमध्ये चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले ती व्हॅन अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हॅनला आरटीओ परवानगी नव्हती, तरीही त्यातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरु होती. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

Badlapur Crime: स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर पुन्हा हादरले
Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली, तरुणीचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. दरम्यान या घटनेनंतर बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे. पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com