अभिजीत देशमुख, साम टीव्ही
Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. बदलापुरातील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांना अटक केली आहे. मागील महिनाभरापासून उदय कोतवाल आणि तुषार आपटे फरार होते. त्यात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर दीड महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांना अटक केली आहे.
आरोपींना अटक करण्यात सुरू असलेल्या दिरांगाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांना कर्जत परिसरातून ताब्यात घेतलं. दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टात हजर जाणार केलं जाणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही कर्जत परिसरात लपून बसले होते. दोघे कर्जत तालुक्यातील नेरळजवळील दामत गावातील फार्म हाऊसवर होते. अखेरीस पोलिसांनी या दोघांचा शोध घेत ताब्यात घेतले. त्यानंतर आता दोघांना उद्याच कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. अक्षय शिंदे ठार झाल्यानंतर शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांना कधी अटक होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्यांच्या शोधावर होते.गेल्या काही दिवसांपासून ते फारार होते. याचदरम्यान, कालच कोर्टाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अर्ज फेटाळताना कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.