Akshay Shinde Case : अक्षय शिंदेचं कुटुंब रस्त्यावर येणार? बँकेकडून घर जप्तीची नोटीस, काय आहे कारण?

Akshay Shinde Home Seizure: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. थकवलेला हफ्ता न भरल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा बँकेने दिला आहे.
Akshay shinde house bank seizure notice
Akshay shinde house bank seizure noticeSaam Tv
Published On

Akshay Shinde Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. अक्षयच्या वडिलांनी एका खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरल्याने बँकेद्वारे जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. या नोटीसची मुदत ४ फेब्रुवारीपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे.

अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खासगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज काढले होते. अत्याचार प्रकरणाबद्दल सर्वांना समजले. महाराष्ट्रभर संतापाची लाट पेटली. अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाली. तेव्हा शिंदे कुटुंब काही दिवसांसाठी बदलापूर सोडून एका अज्ञात स्थळी राहायला गेले.

अज्ञात ठिकाणी राहायला गेल्यावर अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांच्याकडे काम नव्हते. परिणामी त्यांना कर्जाचे हफ्ते भरता आले नाही. बरेच दिवस हफ्ते न भरल्याने बँकेने घरावर थेट जप्तीची नोटीस लावली. प्राथमिक माहितीनुसार, ४ डिसेंबर २०२४ रोजी ही नोटीस लावण्यात आली आहे. नोटीस लावल्यापासून पुढे ६० दिवसात थकीत २ लाख १६ हजार रुपये रक्कम भरा, अन्यथा घर ताब्यात घेऊन जप्त केले जाईल असा उल्लेख बँकेच्या नोटीसमध्ये आहे.

Akshay shinde house bank seizure notice
Akshay Shinde Encounter Case: मोठी बातमी! अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार, न्यायालयीन चौकशीचा अहवाल समोर

बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांवर हल्ला केला. पुढे प्रतिहल्ल्यात त्याचा एन्काऊंट झाला असे म्हटले जात होते. पण अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीसच जबाबदार असल्याचे न्यायालयाने अहवालामध्ये नमूद केले आहे. आत्मरक्षणासाठी गोळ्या चालवल्या असा पोलिसांनी दावा केला होता. आता हा दावा संशयास्पद असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Akshay shinde house bank seizure notice
Saif Ali Khan Attack Update : ...तर सैफ अली खानवर हल्ला झालाच नसता! त्या रात्री घरात नेमकं काय घडलं? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com