

मुंबईहून थेट अलिबागला जाता येणार
अटल सेतू ते अलिबाग फक्त दीड तासात पोहचता येणार
अटल सेतून जेएनपीला जोडणार
मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता मुंबईवरुन अलिबागला जाण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे. फक्त दीड तासात तुम्ही अलिबागला जाऊ शकणार आहात. मुंबईहून अलिबाग गाठणं खूप सोपे आणि जलद होणार आहे. मुंबईचा अटल सेतू थेट अलिबागला जोडला जाणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे.
दीड तासात अलिबाग गाठा (Mumbai to Alibaug in Just 1.5 Hous)
तुम्ही मुंबईवरुन कारने फक्त दीड तासात अलिबागला पोहचू शकतात. अटल सेतू थेट अलिबागला जोडण्याचा प्लॅन सिडकोनं केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न साकारल्यानंतर सिडकोने आता या परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिलाय.
या नवीन प्रकल्पाअंतर्गत मुंबई-नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या 'अटल सेतू'ला थेट विमानतळ, जेएनपीए आणि पुढे अलिबागला जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे नवी मुंबई विमानतळ अलिबाग आणि जेएनपीएला जोडलं जाणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत अटल सेतू ते द्रोणागिरीमार्गे करजा-रेवस पुलापर्यंत कोस्टल कॉरिडोअर उभा केला जाणार आहे. यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि कोकण जोडले जाणार आहे. अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळाला जोडणारा ७ किमीचा ६वा लेन कोस्टल रोड उभारला जात आहे. पुढे हा द्रोणागिरीमार्गे करंज खाडी पुलापर्यंत नेण्याचा सिडकोचा मानस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.