Navi Mumbai Fire : धुराचे लोट, आगीचे लोळ....नवी मुंबईत बांबूच्या गोदामाला भीषण आग, VIDEO

Navi Mumbai Fire News : नवी मुंबईत एका बांबूच्या गोदामाला भीषण आग लागली. घटनेनंतर अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी पोहोचले.

नवी मुंबईतील घणसोली येथे बांबूच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. आग इतकी भयंकर होती की परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ही आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घणसोली येथे बांबूचं गोदाम आहे. या गोदामाला आज, गुरुवारी भीषण आग लागली. परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले होते. आग आजूबाजूला पसरेल या भीतीनं प्रचंड गोंधळ उडाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या बांबूच्या गोदामाजवळच रहिवासी इमारती आहेत. त्यामुळे तिकडे आग पसरू शकते, अशी भीती निर्माण झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कुणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. गोदामात बांबू मोठ्या प्रमाणात असल्यानं काही वेळातच संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com