Antilia Bomb Scare Case: सचिन वाझे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर ५ वर्षांनी आरोप निश्चित

Antilia Bomb Scare Case : पाच वर्षांच्या कालावधीनंतर एनआयए विशेष न्यायालयाने सचिन वाझे आणि प्रदीप शर्मांसह 10 जणांवर आरोप निश्चित केले आहेत. हा खटला UAPA आणि IPC कलमांखाली चालणार आहे.
Antilia Bomb Scare Case latest update after five years
Antilia Bomb Scare Case latest update after five yearssaam tv
Published On
Summary
  • सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह १० आरोपींवर आरोप निश्चित

  • यूएपीए व आयपीसी अंतर्गत खटला चालणार.

  • अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मोठी अपडेट

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात नवीन अपडेट आली आहे. मुंबईतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने ५ वर्षांनी १० आरोपींविरोधात आरोप निश्चित केलेत. आरोप निश्चिती झाल्यामुळे या हायप्रोफाइल प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा आणि खटल्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध गंभीर कलमांखाली खटला चालवला जाणार आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर बेवारस सोडलेली एक संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती.

या गाडीत जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजेच ५ मार्च २०२१ रोजी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत रहस्यमय परिस्थितीत आढळून आला. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच केल्याचा गंभीर आरोप हिरेन यांच्या कुटुंबीयांनी केला होता. एटीएसकडून एनआयएकडे तपास सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे (ATS) होता, मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com