देहूमध्ये बुद्ध मूर्तीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

दरम्यान सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबाना मानवंदना देण्यात आली.
देहूमध्ये बुद्ध मूर्तीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
देहूमध्ये बुद्ध मूर्तीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्नSaam TV
Published On: 

पुणे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे 25 डिसेंबर 1954 साली म्यानमार येथील रंगून येथून आणलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना केली होती. त्याचा आज 67 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. आज वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीम अनुयायी येऊन सामूहिक बुद्ध वंदना त्रिषरण पंचशील घेतले. दरम्यान सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबाना मानवंदना देण्यात आली.

याचं संयोजन भारतीय बौद्ध जन विकास समिती यांच्यावतीने करण्यात आले होते. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे नऊ लाख नागरिकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली असली तरी त्या अगोदर 25 डिसेंबरला 1954 ला याच धम्मभूमी मध्ये बाबासाहेबांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती त्यामुळे देहु रोडला इतिहासात वेगळेच महत्त्व आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.