४० हून अधिक गुन्ह्यांतील फरार सराईत चोर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Andheri Police Arrest Serial Chain Snatcher: अंधेरी पोलिसांनी ४० हून अधिक जबरी चोरी आणि सोनसाखळी चोरी प्रकरणांतील फरार सराईत आरोपीला अटक केली आहे. महिलांना लक्ष्य करणाऱ्या या आरोपीकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Andheri Police officials presenting the arrested serial chain snatching accused involved in over 40 robbery cases in Mumbai
Andheri Police officials presenting the arrested serial chain snatching accused involved in over 40 robbery cases in MumbaiSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: तब्बल ४० हून अधिक जबरी चोरी, सोनसाखळी चोरी व महिलांना लक्ष्य करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत आरोपी वसीम अब्बास मिर्झा उर्फ वसीम जाफर शेख (वय ३८) याला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. तो अनेक दिवसांपासून फरार होता. मंदिर परिसर, गर्दीची ठिकाणे तसेच बाजारपेठेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणे, अशी त्याची कार्यपद्धती होती. त्याच्याविरोधात मुंबईसह उपनगरातील विविध पोलीस ठाण्यांत ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

Andheri Police officials presenting the arrested serial chain snatching accused involved in over 40 robbery cases in Mumbai
Kalyan : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आयुक्तांची मोठी कारवाई! दोन कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन

अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोनसाखळ्यांपैकी काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परागदत्त सिंह दहिया, पोलीस उपआयुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पवार व अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र आणि पीआय गुन्हे विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Andheri Police officials presenting the arrested serial chain snatching accused involved in over 40 robbery cases in Mumbai
मोठी बातमी! BMCच्या ३६ कोटींच्या ठेवी मोडणार, कारणही आलं समोर

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, समाधान सुपे, स. फौ. पेडणेकर, पो.ह. कांबळे, घडवले, पुजारी, शिंदे, पाटील, पोलीस शिपाई म्हात्रे, शिंदे, गवळी, लोंढे, पाटील, टरके, तिघोटे, घुले, नरबट, मोरे आणि पिसाळ यांचे तपास पथकाने अंधेरी गुन्हे प्रकटीकरण पथक करत असून, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com