जोडणाऱ्या हातात ताकत असेल तर चमत्कार घडवण्याची ताकत आपोआप येईल - अमोल कोल्हे

अन्याय अत्याचारावर सतकर्माने विजय मिळवता येतो हे सांगणारी पनती होण्याचा आज दिवशी प्रयत्न करुयात
Amol Kolhe
Amol KolheSaam Tv
Published On

पुणे - केवळ देवाला हात जोडले म्हणून देव चमत्कार करेल, या पेक्षा हनुमंत राया सांगतो की त्या जोडणाऱ्या हातात ताकत असेल तर चमत्कार घडवण्याची ताकत आपोआप येईल अस मत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केलं आहे.

हे देखील पहा -

प्रकाशाने अंधारावर विजय मिळवलाय याच्यावर जगाचा विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर सुर्य असेल तर किमान अन्याय अत्याचारावर सतकर्माने विजय मिळवता येतो हे सांगणारी पनती होण्याचा आज दिवशी प्रयत्न करुयात अशी प्रार्थना आज हनुमान जयंत्तीच्या निमित्ताने करण्याचे आवाहन खासदार अमोल कोल्हेंनी केले आहे.

Amol Kolhe
निकालाआधीच बावड्यात झळकले जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर!

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील आपल्या जन्मगावी असलेल्या हनुमान मंदिरात आज हनुमान जयंती जन्मसोहळयात डॉ. कोल्हे उपस्थित होते.यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. जन्म सोहळ्या निमित्त कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. कोल्हे यांनीही उपस्थित राहून कीर्तन श्रवनाचा आनंद घेतला. या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com