पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल केली, अन् गाडीच पेटली, अंबरनाथमधील घटना

Ambernath bike fire : अंबरनाथमध्ये पेट्रोल तुटवड्याच्या अफवेमुळे टाकी फुल केल्यानंतर दुचाकीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
Ambernath bike fire
Ambernath bike fireसाम टीव्ही
Published On

अजय दुधाने, अंबरनाथ, साम टीव्ही प्रतिनिधी

Ambernath bike fire news : आखाती देशात युद्धाचा परिणाम भारतावरही होत आहे. त्यातच मुंबई, पुण्यासह राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याची चर्चा सुरू आहे. या तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. अंबरनाथमध्ये अशाच एका वाहनचालकाने टाकी फुल केली, पण त्यामुळे चक्क त्याची दुचाकी जळून खाक झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

अंबरनाथच्या सारंग पोळके यांनी गुरुवारी दुपारी कामावरून येताना दुचाकीत टाकी फुल होईपर्यंत पेट्रोल भरलं. यानंतर हे हायवेने अंबरनाथमध्ये आले असता नवरेनगर बस स्टॉपजवळ त्यांच्या गाडीला अचानक आग लागली. यावेळी त्यांनी स्थानिकांकडून पाणी घेऊन आग विझवण्याचाही प्रयत्न केला, पण गाडीत टाकी भरून पेट्रोल असल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानात चांगलीच वाढ झालीये. अशावेळी पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल्ल केल्यामुळे उष्णता निर्माण होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या घटनेनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपली आणि आपल्या वाहनांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय.

Ambernath bike fire
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ₹४५००; 'हे' आहे कारण, वाचा लेटेस्ट अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com