Ambernath Accident: अंबरनाथमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना उडवलं, VIDEO

Ambernath Police: अंबरनाथमध्ये भरधाव ट्रेलरने पोलिसांच्या व्हॅनसह ५० वाहनांना धडक दिली. अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली- बदलापूर पाईपलाईन रोडवर अपघाताची ही घटना घडली. पोलिसांनी ट्रेलर चालकाला अटक केली.
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना उडवलं
Ambernath AccidentSaam Tv
Published On

मयूरेश कडव, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना धडक दिली. टालकाने चुकीच्या बाजूने ट्रेलर चालवत पोलिसांच्या वाहनासह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची घटना घडलीये. या मद्यधुंद ट्रेलर चालकाला पोलिस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडलं. या अपघातामध्ये ५० वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली- बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला. नेवाळी नाक्याकडून बदलापूरच्या दिशेनं निघालेल्या भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर पालेगाव, अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात चुकीच्या बाजूने जात या ट्रेलरने अनेक वाहनांना धडक दिली. चालक मद्यधुंद अवस्थेत होता.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना उडवलं
Ambernath News: शिंदेंचा विश्वासू शिलेदार, ४ वेळा आमदार, बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट, शिवसेनेच्याच २ कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

ट्रेलर चालकाने वाटेत समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. यात कार, दुचाकी, रिक्षा, इतकंच नव्हे तर पोलिसांच्याही गाडीचे देखील मोठं नुकसान झालं आहे. तर एका दुचाकी चालकाला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केली. शिवाजीनगर पोलिस आणि रिक्षाचालक पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच मद्यधुंद ट्रेलर चालकानं आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर घुसवला.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना उडवलं
Pushpak Express Accident: जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३ वर, ७ जणांची ओळख पटली; पाहा मृतांची यादी

पोलिसांना पाहून थांबण्याऐवजी ट्रेलर चालकाने अतिवेगामुळे ट्रेलर चालवला. शेवटी हा ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या. या भीषण अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी काही जण जखमी झाले आहेत. तर किमान ५० वाहनांचे या अपघातामध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना उडवलं
Pushpak Express Railway Accident जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com