Ambernath Crime : अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; मध्यरात्री धाड टाकून ५ जणांना अटक

Ambernath Police Fake Call Centre Busted News : अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकत अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. बिटकॉईनद्वारे पैसे उकळणाऱ्या या प्रकरणात ५ जणांना अटक करून इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; मध्यरात्री धाड टाकून ५ जणांना अटक
Ambernath Police Fake Call Centre Busted NewsSaam Tv
Published On
Summary
  • अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पोलिसांकडून पर्दाफाश

  • अमेरिकन नागरिकांकडून डॉलर व बिटकॉईनद्वारे फसवणूक

  • पोलिसांची रात्री धाड

  • कॉल सेंटर मालकासह ५ आरोपींना अटक

अजय दुधाणे - उल्हासनगर

Ambernath Police Fake Rudra Tech Call Centre Busted Crime News बदलापूरनंतर अंबरनाथमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरमधून सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना गंडा घातला जात होता. यातून आत्तापर्यंत हजारो अमेरिकन नागरिकांकडून कोट्यवधी रुपये लुबाडण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र टेक आयटी सर्व्हिस असं या बनावट कॉल सेंटरचं नाव आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये तिसऱ्या माळ्यावर हे कॉल सेंटर सुरू होतं. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसाला अमेरिकन नागरिकांना लुटण्याचं टार्गेट ठरवून दिलं जात होतं.

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; मध्यरात्री धाड टाकून ५ जणांना अटक
Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

त्यानुसार हे कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल करून वेबसाईट डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली संपर्क साधायचे आणि त्यांच्याकडून १०० ते २०० डॉलर ऍडव्हान्स मागवायचे. हे पैसे ते बिट कॉईन अकाऊंटमध्ये जमा करायचे. तसेच एकदा पैसे आले, की त्या अमेरिकन नागरिकाला ब्लॉक केलं जायचं. याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास या कॉल सेंटरवर धाड टाकली.

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; मध्यरात्री धाड टाकून ५ जणांना अटक
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला; ६०० कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश

ही कारवाई बुधवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधले लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल फोन्स जप्त केले आहेत. तसंच अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारा कॉल सेंटरचा मालक कमलेश सचवानी याच्यासह एकूण ५ जणांना बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com