Ambernath Crime: ... तर आज सीमा वाचली असती! अंबरनाथ हत्याकांडाचं विदारक सत्य आलं समोर

Ambernath Crime: सीमा कांबळे या महिलेची हत्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झालीये का? असा सवाल केला जात आहे. हत्या होण्यापूर्वी सीमा कांबळेने पोलिसात तक्रार दिली होती.
Ambernath  Crime
Ambernath CrimeSaam Tv
Published On

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

अंबरनाथमध्ये सोमवारी सीमा कांबळे या महिलेची झालेली हत्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झालीये का? अशी चर्चा आता सुरू झालीये. कारण या हत्येच्या काही दिवस आधी मृत सीमा कांबळेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल भिंगारकर विरोधात तक्रार अर्ज दिला होता. मात्र राहुल यानं कोणत्या तरी पंडिताला दक्षिणा दिली, अन पंडिताने आशीर्वाद देत मोकाट सोडल्यानेच त्याने ही हत्या केली, अशी कुजबुज खुद्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यातच सुरू आहे.

आरोपी राहुल भिंगारकर याला मृत सीमा कांबळेने अडीच लाख रुपये दिले होते. पण तो पैसे परत करत नसल्यानं सीमाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. यानंतर सीमा आणि राहुल यांचे स्टेटमेंट घेत त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र या सगळ्यात एका पंडिताने राहुलची कुंडली काढली आणि कारवाई, म्हणजेच शनीचा प्रकोप टाळण्यासाठी दक्षिणा घेतली आणि मग आशीर्वाद देत त्याला मोकाट सोडलं, अशी कुजबुज पोलीस ठाण्यात आहे.

Ambernath  Crime
Navi Mumbai Crime: मित्राच्या मदतीने जिवलगाची दगडाने ठेचून हत्या, वॉलेटमुळे हत्येचं गूढ उलगडलं; नवी मुंबईत खळबळ

दक्षिणा देऊन आपण काहीही करू शकतो, या मानसिकतेतून राहुलनं सीमाची हत्या केली, अशी कुजबुज पोलीस ठाण्यात आहे. वेळीच जर सीमाची तक्रार घेऊन गुन्हा दाखल झाला असता, तर आज तिची हत्या झाली नसती, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळं आता या पंडितावर त्याचे गुरू, महागुरू कारवाई करतात, की पाठीशी घालतात, हे आता पाहावं लागेल.

Ambernath  Crime
Shirdi Murder Case: शिर्डी हत्याकांड प्रकरणी मोठी लीड; आणखी एक आरोपी जाळ्यात, ३६ तासापासून देत होता गुंगारा

अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रीजवर तरुणाने धारदार शस्त्राने महिलेची हत्या केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. अंबरनाथमध्ये भरदिवसा झालेल्या महिलेच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली होती. उसने दिलेले पैसे परत मागणे, लग्नाचा तगादा महिलेकडून केला जात असल्याने तरुणाने चाकू भोसकून महिलेची हत्या केली.

काय आहे घटना

अंबरनाथमधील बारकूपाडा भोईर चाळ परिसरात सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर हे दोघे शेजारी राहत होते. या दोघांची मैत्री होती. सीमाचा नवरा तिला सोडून गेला आहे. त्यामुळे ती १३ वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. सीमा सध्या बेबी सिटिंगमध्ये काम करत होती. याच सीमानं राहुलशी असलेल्या मैत्रीतून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते. मात्र ते पैसे तो परत करू शकत नव्हता. त्यामुळे सीमाने राहुलला लग्न कर किंवा माझे पैसे परत कर, असा तगादा लावला होता. तसंच लग्न केलं नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिने राहुलला दिली होती. यामुळे दोघांमध्ये वाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com