Navi Mumbai Crime: मित्राच्या मदतीने जिवलगाची दगडाने ठेचून हत्या, वॉलेटमुळे हत्येचं गूढ उलगडलं; नवी मुंबईत खळबळ

Digha Navi Mumbai Crime News: पोलीस तपासात एटीएमच्या सिसीटीव्हीमुळे आपले बिंग फुटेल या भीतीने दीपक बिद याने सहकारी दीपक गौड याच्या सहाय्याने मनोजची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केलीय.
Navi Mumbai Crime
Digha Best friend kills friendSaamTV
Published On

नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा येथे मनोज बिद या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने उलगडा केलाय. मनोजचा जिवलग मित्र दीपक बिद यानेच एका सहकाऱ्याच्या मदतीने मनोजची हत्या केली असल्याचं आता समोर आलं आहे. मनोजचं पाकीट चोरून त्यातील एटीएमचा वापर करुन दीपकने २५ हजार रुपये काढले. मनोजने या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली होती.

पोलीस तपासात एटीएमच्या सिसीटीव्हीमुळे आपले बिंग फुटेल या भीतीने दीपक बिद याने सहकारी दीपक गौड याच्या सहाय्याने मनोजची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केलीय. या प्रकरणी पोलिसांनी दीपक बिद आणि दीपक गौड यांना अटक केली असून रबाळे एमआयडीसी पोलीस य़ा घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Navi Mumbai Crime
Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय, पुणे-सातारकरांना होणार फायदा!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २४ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना दक्षिण मुंबईत घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपासात हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर २४ वर्षीय महिलेला अटक तर, अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत राहत आहे. तिचे पालक मुंबईच्या उपनगरात राहतात. ७ जानेवारीला तिने कॉलेजला जाते म्हणून घर सोडलं. नंतर आईला कॉलेज जात आहे, काळजी करु नकोस, असा मेसेज केला. मात्र, काही तासानंतर तिचा फोन बंद लागला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गु्न्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

Navi Mumbai Crime
Chhatrapati Sambhaji Nagar: रील्सवाल्या भाईंची पोलिसांनी मस्ती जिरवली, अख्ख्या शहरात धिंड काढली, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com