Akshay Shinde encounter case High Court orders
Akshay Shinde encounter case High Court ordersSaam Tv News

Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Akshay Shinde Encounter Case : बदलापूरच्या एका शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला होता. सुनावणीच्यावेळी त्याला नेण्यात येत असताना मुंब्र्याच्या परिसरात त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.
Published on

मुंबई : बदलापूरच्या अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्यावर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश या आधीच न्यायालयाने दिले होते. आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता राज्य सरकारने केलेली मागणी फेटाळण्यात आली.

बदलापूरच्या एका शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला होता. सुनावणीच्यावेळी त्याला नेण्यात येत असताना मुंब्र्याच्या परिसरात त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. मात्र, हा एन्काऊंटर बनावट असल्याचा अहवाल नंतर समोर आला. त्यानंतर या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Akshay Shinde encounter case High Court orders
Supriya Sule : ती कुणाची आई, बहीण अन् बायको होती...; हॉस्पिटलला माणुसकी आहे की नाही? सुप्रिया सुळे संतापल्या

पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?

१. निलेश मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक

२. हरीष तावडे, पोलिस हवालदार

३. संजय शिंदे, पोलिस निरीक्षक

४. अभिजीत मोरे, पोलिस हवालदार

मुंबई पोलीस सहआयुक्त गुन्हे यांना या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर कारवाईची मागणी करत याचिका दाखल केली होती. या घटनेबाबत दंडाधिकारी कोर्टानं पोलिसांच्या कारवाईवर ठपका ठेवला होता. यावर विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली होती.

Akshay Shinde encounter case High Court orders
Tanisha Bhise death case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी सीआयडी चौकशीचा अहवाल बाकी असल्याचा दावा सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला. तसेच, ठाणे सत्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करत संबंधित पोलिसांना दिलासा दिल्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते.

Akshay Shinde encounter case High Court orders
Rupali Chakankar : रुग्ण ५ तास हॉस्पिटलमध्ये, रक्तस्त्राव सुरुच होता, तनिषा भिसेंचं मानसिक खच्चीकरण; चाकणकरांनी सगळंच सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com