How to Search Ancestral Property Online: आमच्या आजोबांची भरपूर जमीन होती रे, पण कागदपत्रेच मिळत नाहीत. पूर्वजांची कुठेतरी शेती होती म्हणतात, पण नक्की कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही" असे संवाद तुम्हीही तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये कधी ना कधी नक्कीच ऐकले असतील.
अनेकदा जुन्या काळात जमिनीचे व्यवहार तोंडी व्हायचे किंवा कागदपत्रे कुठेतरी गहाळ होऊन जायची. त्यामुळे पूर्वजांची नक्की कुठे आणि किती जमीन होती, याबद्दल आजच्या पिढीला काहीच माहिती नसते. पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या पूर्वजांच्या नावावर असलेली आणि वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली ती संपत्ती आजही तुमच्या नावावर होऊ शकते.
पूर्वी जमिनीचा शोध घेण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा तहसीलदारांच्या कचेरीचे शेकडो चक्कर मारावे लागायचे. परंतु आता डिजिटल युगात ही डोकेदुखी पूर्णपणे संपली आहे. आता तुम्हाला कुणालाही लाच द्यायची गरज नाही की सरकारी ऑफिसात रांगेत उभे राहायची गरज नाही. तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करून तुम्ही आजोबा-पणजोबांच्या जमिनीचा ७/१२, फेरफार उतारा आणि नकाशा अगदी सहज शोधू शकता. तुमच्या पूर्वजांच्या जमिनीचे डिजिटल कागदपत्रे नक्की कसे शोधायचे? तुमच्या नावाची शोधमोहीम ऑनलाईन कशी करायची? जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत...
तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर (Computer) क्रोम ब्राऊजर (Chrome Browser) राज्याची अधिकृत 'भूलेख' (Bhulekh) वेबसाईट उघडा. गूगलवर तुमच्या राज्याचे नाव टाईप करा आणि त्यापुढे 'भूलेख' (Bhulekh), 'लँड रेकॉर्ड्स' (Land Records) किंवा 'महसूल विभाग' (Revenue Department) असे लिहून सर्च करा. वेबसाईट उघडल्यानंतर तिथे तुम्हाला 'जमिनीचा रेकॉर्ड पहा' (Land Record / 7/12 Online) असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा. आता तुम्हाला जमीन नक्की कुठे आहे, त्या ठिकाणाची माहिती निवडावी लागेल.
आजोबा किंवा पणजोबांच्या नावाने शोध घ्या
वेबसाईटवर जमिनीचा रेकॉर्ड शोधण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पर्याय मिळतील. अनेक पोर्टल्सवर खातेदाराचे नाव, सर्व्हे नंबर / गट नंबर (खसरा नंबर), खाते नंबर किंवा फेरफार नंबर टाकून माहिती शोधण्याची सुविधा असते. जर तुमच्याकडे गट नंबर किंवा खाते नंबर नसेल, तर खातेदाराचे नाव वापरून शोध घेणे सर्वात सोपे ठरते. ज्या आजोबा किंवा पणजोबांच्या नावावर जमीन असू शकते, त्यांचे नाव टाकून सर्च करा.
जुन्या सरकारी कागदपत्रांमध्ये नावाची स्पेलिंग किंवा नाव लिहिण्याची पद्धत वेगळी असू शकते. जर नाव जुळले नाही, तर रेकॉर्ड सापडणार नाही. अशा वेळी नावाचे वेगवेगळे उच्चार किंवा नावाचे पहिले अक्षर बदलून शोधण्याचा प्रयत्न करा (उदा. उपनाव आधी किंवा नाव आधी टाकून पाहा.
ऑनलाइन महाभूलेख पोर्टलवर दिसणारी माहिती ही जमिनीशी संबंधित सरकारी नोंदींचा एक महत्त्वाचा भाग असते; परंतु, प्रत्येक बाबतीत या ऑनलाइन उताऱ्यालाच खरेदीखत (रजिस्ट्री) किंवा मालकी हक्काचा शेवटचा/अंतिम पुरावा मानले जाऊ शकत नाही. जर जमिनीची विक्री, वारस हक्क (वारस नोंद), जमिनीची वाटणी, कोर्टातील केस किंवा मालकी हक्कावरून काही वाद असेल, तर जुने खरेदीखत (रजिस्ट्री कागदपत्रे), फेरफार उतारा, जमाबंदी आणि इतर संबंधित जुने अभिलेख तपासणे अत्यंत गरजेचे असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.