Ajit Pawar : देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, संविधान; प्रजाकसत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून खास संदेश, वाचा

Ajit Pawar on Republic Day : प्रजाकसत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून जनतेल खास संदेश देण्यात आला आहे. आज भारतमातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस असल्याचं अजित पवारांनी म्हटलं.
 Ajit Pawar DCM
Ajit Pawar saam Tv
Published On

मुंबई : देशाचं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाचं संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहूती दिली. अशा भारतमातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 Ajit Pawar DCM
Republic Day 2025: तिरंगा फडकवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रजाकसत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं. देशाचे महान स्वातंत्र्यसैनिक, कुटुंबीयांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळालं. देशाची एकता, अखंडता सार्वभौमता अबाधित ठेवण्याचं सामर्थ्य संविधान, लोकशाही व्यवस्थेत आहे. तसेच सर्वधर्मसमभावाच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळे संविधान,लोकशाही, सर्वधर्मसमभावाच्या विचाराचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी दृढसंकल्प होऊया, असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं.

 Ajit Pawar DCM
Republic Day 2025 : महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; ३९ जवान ठरले सेवा पदकाचे मानकरी, वाचा संपूर्ण यादी

अजित पवार पुढे म्हणाले, 'देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मागील ७६ वर्षांच्या वाटचालीत देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, शिक्षक, संशोधक,सैनिक, साहित्यिक, खेळाडू, कलावंत अशा अनेकांनी परिश्रमाने देशाचा गौरव वाढवला आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीने देशाच्या प्रगतीत,जडणघडीत योगदान दिलं आहे. हा देश प्रत्येक देशवासियांचा असून आपल्याला एकजुटीतूनच बलशाली भारत भक्कमपणे उभा आहे. आपली एकजूट अशीच कायम ठेवूया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. तसेच त्यांनी जनतेला प्रजासत्ताकदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

 Ajit Pawar DCM
Central Government: पैसा नसला तरी उच्च शिक्षणाचं होईल स्वप्न पूर्ण; सरकारने लागू केली नवी योजना, केंद्राचा मोठा निर्णय

केंद्र सरकारकडून चितमपल्ली यांना पद्मश्री

केंद्र सरकारकडून अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मारुती चितमपल्ली यांनी स्वतःची हयात वृक्ष प्राणी आणि पक्षांसाठी घालवली आहे. मारुती चितमपल्ली यांचे वन्यजीवासंदर्भात अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मारुती चितमपल्ली यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com