Ajit Pawar & Nana Patekar
Ajit Pawar & Nana PatekarSaam Tv

"अजित पवार इमानाने गुपचुप काम करत राहतात" - नाना पाटेकरांचा अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे गाव कोविडमुक्त ठेवण्याबाबत पुण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता.
Published on

पुणे: "अजित पवार इमानाने गुपचुप काम करत रहतो" असं वक्तव्य करत अभिनेता नाना पाटेकर यांनी उपमुख्यंत्री अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे गाव कोविडमुक्त ठेवण्याबाबत पुण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नाना पाटेकरही (Nana patekar) उपस्थित होते. ("Ajit Pawar keeps working secretly with faith" Nana Patekar showers appreciation on Ajit Pawar)

हे देखील पहा -

नाना पाटेकर आपल्या भाषणात म्हणाले की, अजित पवार हा माणूस जितके काम करतो त्याची, जाहिरात कधी करत नाही. अजित इमानाने गपचूप काम करत राहतो. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित तुम्ही अधोरेखीत करता असा टोलाही त्यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, केलेलं काम समोर आणा, तो (अजित पवार) खरंच चांगला नेता. राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही, आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका, मग कोणीही पक्ष बदलणार नाही असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com