Maharashtra Politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वेगळा विचार सुरू? पडद्यामागं नेमकं काय घडतंय?

ajit Pawar Group latest news : आरएसएसने टीका केल्यानंतर वेगळा विचार करण्याची भाषाही अजित पवारांच्या आमदारांनी सुरु केली आहे. अजित पवारांच्या पक्षात नेमकं काय सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वेगळा विचार? पडद्यामागं नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar Saam Tv

मुंबई : लोकसभेतल्या पराभवावरून महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर आता दादांच्या राष्ट्रवादीतही धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजित पवारांच्या आमदारांनी भाजपवर केला आहे. एवढंच नव्हे तर वेगळा विचार करण्याची भाषाही अजित पवारांच्या आमदारांनी केली आहे. अजित पवारांच्या पक्षात नेमकं काय सुरू आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे लोकसभेत पराभव झाल्याचे सांगत आरएसएसनं भाजपचे कान टोचले. त्यामुळे महायुतीत वादाचा खडा पडला. आता त्यावरून महायुतीत मोठी धुसफूस सुरू झाली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वेगळा विचार? पडद्यामागं नेमकं काय घडतंय?
Maratha VS OBC Aarakshan: राज्यात आरक्षणा आंदोलनांचा भडका, आता ओबीसी आरक्षण आंदोलन पेटलं; जरांगे आणि हाके आमनेसामने

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच फटका बसल्याची चर्चा भाजपमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळेच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे. उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच भाजप आणि शिंदे गटाला फायदा झाल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर अजित पवारांना टार्गेट करणं थांबलं नाही तर विधानसभेत वेगळा विचार करण्याचा थेट इशाराच मिटकरींनी दिला.

भाजपनं मात्र यावर सबुरीची भूमिका घेतली. अजित पवारांवर भाजपच्या कुणीही टीका केलेली नाही असं सांगत महायुतीची मोट घट्ट असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवरही तातडीनं मिटकरींच्या इशा-यांवर खुलासा करण्याची वेळ आली. एवढंच नव्हे तर महायुतीत सारंकाही आलबेल दाखवण्यासाठी मिटकरींना समज देणार असल्याचंही त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगून टाकलं.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वेगळा विचार? पडद्यामागं नेमकं काय घडतंय?
CM Eknath Shinde Video: शिवसेना कुणाची याचा निकाल या निवडणुकीत जनतेने दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

अजित पवारांशी युतीवर संघानं टीका केल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक नुकसान होऊनही त्यांनाच पराभवाला जबाबदार धरल जातंय. त्यामुळे अजित दादांच्या पक्षात धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com