अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय घडमोडींना वेग आला आहे. अनेक राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवात केली आहे. दुसरीकडे राज्यात अजित पवार गटाला गळती लागल्याचे दिसत आहे. आता पुन्हा एकदा २५० पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकला आहे. शेकडो पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिल्याने अजित पवारांचं वाढल्याचं दिसून येत आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहे. आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणखी २५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे. पक्षाच्या विविध पदांवरून राजीनामे देणाऱ्या संख्या आता ८५० वर पोहोचली आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी दीपक मानकर यांची वर्णी लागावी, यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, दीपक मानक यांना डावलण्यात आलं. याचा परिणाम म्हणजे पहिल्याच दिवशी ६०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तर आज गुरुवारी २५० जणांनी राजीनामे दिले आहेत.
पुण्यातील शिरूर हवेलीची जागा अजित पवार गटाच्या उमेदवारला उमेदवारी मिळाली आणि आयात उमेदवार उमेदवारी दिली गेली तर मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. यामुळे अजित पवारा यांची डोकेदुखी वाढू शकते. आयात उमदेवार आणल्यास मतदारसंघात मोठी बंडखोरी निर्माण होऊन विरोधी उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.