Maharastra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; संजीवराजे,दीपक चव्हाणांच्या हाती तुतारी, आता फलटणमध्ये गणित काय? VIDEO

Ajit pawar News : साताऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का बसलाय. रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. फलटणमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पाहूया त्यासंदर्भातला रिपोर्ट
Ajit pawar News
Maharastra Politics :Saam tv
Published On

मुंबई : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहतायत..अशातच लोकसभेपासून महायुतीशी दुरावलेल्या फलटणच्या राजे गटानं विधानसभेला तुतारीचा गजर करण्याचा निर्णय़ घेतलाय... फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाणांनी हाती तुतारी घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलायं. तर विशेष म्हणजे रामराजेंचे सुपुत्र अनिकेत यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत हाती तुतारी घेतलीये.

दरम्यान,दीपक चव्हाणांना अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर करुन देखील ते पक्ष बदलतायत. दीपक चव्हाण हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दीपक चव्हाण कोण पाहूयात...

Ajit pawar News
Baba Siddique News : सलमानशी मैत्री, बिश्नोईची धास्ती; धमकी, रेकीनंतर मित्राला संपवलं, पाहा स्पेशल रिपोर्ट

दीपक चव्हाणांच्या हाती तुतारी -

- फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार

- दीपक चव्हाणांना अजित पवारांकडून उमेदवारी, तरी पक्षाला सोडचिठ्ठी

- 2009, 2014, 2019च्या विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण विजयी

- यंदा तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार

Ajit pawar News
Sharad Pawar Speech: 'पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे', फलटणच्या सभेत शरद पवार यांचं रोखठोक भाषण

फलटणमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळं तालुक्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. रामराजे निंबाळकरांनी तुतारी हाती घेतली नसली तरी पक्षप्रवेशाच्या घडामोडी आणि बैठकांमध्ये रामराजे निंबाळकर उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. आगामी काळात रामराजे काय भूमिका घेतात यापेक्षा पडद्याआड कोणाला मदत करतात यावरच फलटणचं राजकीय गणित अवलंबून असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com